नाशिकमध्ये घरकामासाठी मुलींना विकणारे रॅकेट उघड

April 5, 2012 2:28 PM0 commentsViews: 6

05 एप्रिल

लग्नाचं आमिष दाखवून मुलींना घरकामासाठी विकणारं रॅकेट नाशिकमध्ये उघड झालं आहे. औरंगाबादच्या लातूरमधल्या सोनी आणि कोठारी कुटुंबांनी घरकामासाठी या मुलींची खरेदी केल्याची तक्रार आहे. पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये या दोन्ही तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पहिल्या तक्रारीत पोलिसांनी कोठारी मुलगा आणि वडिलांना अटक केली आहे , पण दुसर्‍या तक्रारीत अजून कोणाला अटक नाही. यातली मुख्य आरोपी फुलं विक्रीचा व्यवसाय करणारी जया शर्मा, बबिता लोणारी आणि प्रणिता लोणारी फरार आहेत. गरीब घरातल्या मुलींना लग्नाचं आमीष दाखवून घरकामासाठी विकणार्‍या या टोळीचा छडा नाशिक पोलीस अद्याप लावू शकलेले नाहीत.

close