सराफांच्या मागण्यांच्या विचार करु – सोनिया गांधी

April 6, 2012 8:58 AM0 commentsViews: 4

06 एप्रिल

सोन्यावरची एक्साईज ड्युटी हटवण्याच्या मागणीत लक्ष घालावे यासाठी सराफांच्या शिष्टमंडळाने आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. मागण्यांवर विचार करण्याचं आश्वासन सोनियांनी सराफांना दिलं. सराफांच्या मागण्याचा सहानुभुतीपूर्वक विचार करा असं काँग्रेसने सरकारला सांगितले. देशभरातल्या महत्त्वाच्या शहरातले सराफ केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांचीही भेट घेतली.

गेल्या 21 दिवसांपासून देशभरातल्या ठिकठिकाणच्या सराफांनी आंदोलन पुकारले. सोन्यावरचे वाढीव 2 टक्के आयात करही कमी करावे अशी त्यांची मागणी आहे. एक्साईज ड्युटी कमी करण्यासाठी प्रणव मुखर्जी यांच्यावर मोठा दबाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सराफांच्या काही मागण्या मान्य होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सोन्यावरचा टॅक्स हटवण्याचा निर्णय अर्थमंत्र्यांच्या विचाराधीन आहे तेच योग्य निर्णय घेतील अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायणसामी यांनी दिली. दरम्यान, सराफांचं ठिकठिकाणी आंदोलन सुरूच आहे. सोन्यावरची एक्साईज ड्युटी हटवण्यात यावी यासाठी पुण्यातल्या सराफ संघटनेनं आज आंदोलन केलं. दगडूशेठ हलवाई गणपती इथं घंटानांद आंदोलन करण्यात आलं. सरकारने सराफांची मागणी लवकर मान्य करावी यासाठी, दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं घालण्यात आलं.

close