तहसिलदाराला धमकी देणार्‍या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षाला अटक

April 5, 2012 8:08 AM0 commentsViews: 1

05 एप्रिल

रोह्यामध्ये तहसिलदाराला धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीचा निलंबित शहराध्यक्ष नितीन परबला पहाटे मुंबई -पुणे मार्गावर खालापूरजवळ अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी परबची कार आणि रिव्हॉल्व्हरही जप्त केली आहे. दोनच दिवसांपूर्वी तहसिलदार गणेश सांगळे यांना धमकी दिल्याप्रकरणी परब यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा निषेध करत गेल्या तीन दिवसांपासून रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात महसूल कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे.

close