सराफांचा संप मागे

April 6, 2012 9:37 AM0 commentsViews: 7

06 एप्रिलगेल्या 21 दिवसांपासून सुरु असलेले सराफांचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. आज सराफांच्या शिष्टमंडळाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. सराफांच्या मागण्यांवर विचार करण्याचं आश्वासन सोनियांनी सराफांना दिलं. सराफांच्या मागण्याचा सहानुभुतीपूर्वक विचार करा असं काँग्रेसने सरकारला सांगितले. देशभरातल्या महत्त्वाच्या शहरातले सराफ केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांचीही भेट घेतली. या भेटीनंतर सराफांना आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.गेल्या 21 दिवसांपासून देशभरातल्या ठिकठिकाणच्या सराफांनी आंदोलन पुकारले. सोन्यावरचे वाढीव 2 टक्के आयात करही कमी करावे अशी मागणी सराफांनी केली होती. दरम्यान, सोन्यावरचा टॅक्स हटवण्याचा निर्णय अर्थमंत्र्यांच्या विचाराधीन आहे तेच योग्य निर्णय घेतील अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायणसामी यांनी दिली.

close