शुभम शिर्केची केस उज्ज्वल निकम लढवतील – गृहमंत्री

April 5, 2012 1:13 PM0 commentsViews: 10

05 एप्रिल

राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी आज शुभम शिर्केच्या पालकांची भेट घेतली. प्रसिध्द वकिल उज्ज्वल निकम आता शुभम शिर्केची केस चालवतील असं आश्वासन आर आर पाटील यांनी यावेळी शुभमच्या पालकांना दिलं.क्राईम सिरियल पाहुन 50 हजार रुपयांच्या खंडणीसाठी शुभमचं अपह्ररण करुन खून करण्यात आला. शुभमच्या मित्रांनीच त्याचा खून केला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. हे तिघही जण अल्पवयीन आहे. मात्र शुभमच्या पालकांनी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. यासाठी उज्ज्वल निकम यांना ही केस द्यावी अशी मागणी केली होती. आज आर.आर.पाटील यांनी याबद्दल आश्वासन दिले.

close