बेस्टची डबलडेकर बस उलटली, 1 ठार

April 6, 2012 1:20 PM0 commentsViews: 1

06 एप्रिल

मुंबईत वाद्रे येथील कलानगर येथे मातोश्री बंगल्याजवळील सिग्नलवर वळण घेताना बेस्टच्या 310 नंबरच्या डबलडेकर बसला अपघात झाला. यामध्ये 1 जण ठार तर 4 ते5 जण गंभीर जखमी झालेत. वांद्रे कलानगरमध्ये 310 नंबरची बस एका भींतीवर आदळून उलटली. या बसमध्ये जवळजवळ 50 प्रवासी होते. बस भरघाव वेगात असताना भिंतीवर आदळली आणि उलटली. या बसखाली एक दुचाकी स्वार आल्याने तो ठार झाला. याअपघातात दुचाकीचा चुराडा झाला.तर चार ते पाच प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार, कुर्ला आगारकडे ही बस भरधाव वेगाने जात होती. कलानगरच्या सिग्नलवर येत असताना अचानक बसवरचा ताबा सुटला आणि सिग्नलवर उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराला धडक दिली आणि बस समोरील भींतीवर जाऊन आदळून उलटली.

close