पाचगणीत स्ट्रॉबेरी फेस्टिव्हलची धम्माल

April 6, 2012 7:44 AM0 commentsViews: 7

06 एप्रिल

शेतातून ताजी स्ट्रॉबेरी खाण्याची मजा पर्यटकांना अनुभवायला मिळतेय ती सातारा पाचगणी इथल्या स्ट्रॉबेरी फेस्टिव्हलमध्ये. आणि या फेस्टिव्हलची सुरुवात झाली ती भिलार गावातून चित्ररथ काढून आणि वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या फेस्टिव्हवलमध्ये स्ट्रॉबेरीचे विविध पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. इतक्यामोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरीपाहुन कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशी ताजी, लालचुटुक स्ट्रॉबेरी खाण्यातली मजाच निराळी. स्ट्रॉबेरी पहाण्यासाठी, खरेदी करण्यासाठी आणि चवीने आस्वाद घेण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत.

close