रत्नागिरीजवळ बिबट्याची शिकार

April 5, 2012 5:11 PM0 commentsViews: 2

05 एप्रिल

मुंबई-ग़ोवा हायवेवर रत्नागिरीजवळच्या निवळी फाट्यालगत शिकार झालेला बिबट्या आढळून आला. या बिबट्याच्या चारही पायांचे पंजे तोडण्यात आले आहे. बिबट्याला किमान चार गोळ्या घातल्या गेल्याचं पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले आहे. बिबट्याचा मृत्यू तीन दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज आहे. वनविभागाने याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या महिनाभरात 5 बिबट्यांचा मृत्यू झाला असून अनेक वेळा रानडुकरांच्या शिकारीसाठी लावण्यात येणा-या फ़ासात अडकून बिबटे मृत्यूमुखी पडत असल्याचे पुढे आले आहे. वनविभागाने या बिबट्याच्या शिकारीबाबत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

close