दिवेआगरच्या गावकर्‍यांचे उद्यापासून उपोषण

April 7, 2012 9:58 AM0 commentsViews: 3

07 एप्रिल

दिवेआगर गणेश मूर्ती चोरी प्रकरणी आता 15 दिवस उलटूनही कुठलाही तपास लागलेला नाही. 24 मार्चला दिवेआगरची सुवर्णगणेश मूर्ती चोरीला गेली. पण आता तब्बल 15 दिवस उलटून गेलेत तरीही याप्रकरणी दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आलं नाही. दिवे आगारच्या ग्रामस्थांनी आज बोरली पंचतन पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला आणि आपला निषेध नोंदवला. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करत त्यांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर आरतीही केली. या प्रकरणी वेगानं तपास सुरु आहे आणि दरोडेखोरांना लवकरात लवकर पकडण्यात येईल असं आश्वासन पोलीस देत आहे.

पेशवेकालीन असणारी ही गणेशमूर्ती चोरीला गेल्यामुळे, दिवेआगरमधला भक्तांची वर्दळहीकमी झाली आहे. आणि याचा फटका तिथल्या ग्रामस्थांना बसला. शिवाय मूर्तीचा सोन्याचा मुकुटही चोरीला गेला. त्यामुळे भक्तांची श्रद्धाही दुखावली गेली. त्यामुळे लवकरात लवकर जर मूर्ती मिळाली नाही तर उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

close