दुष्काळग्रस्त भागात टँकरने पाणी पुरवढा करणार- मुख्यमंत्री

April 7, 2012 1:00 PM0 commentsViews:

07 एप्रिल

राज्यातल्या दुष्काळी स्थितीवर चर्चा करण्यासाठी पुण्यात यशदामध्ये महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत दुष्काळग्रस्तांसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यात वीज बिलाची माफी, सक्तीची वसुली थांबवणे, विद्यार्थ्यांची फी माफ करणे, टँकरनं पाणी पुरवढा करणे यासारखे अनेक निर्णय घेण्यात आले. त्याचबरोबर केंद्राला दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी समिती पाठवण्याची विनंतीही करण्यात आली. या बैठकीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संबंधीत खात्यांचे मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.

close