बापाने घोटला मुलीचा गळा

April 9, 2012 8:59 AM0 commentsViews: 5

09 एप्रिल

सातार्‍यातील ऑनर किलिंगची घटना ताजी असतानाच जळगाव जिल्ह्यातील पाथरी गावातही ऑनर किलिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या बापानंच आपल्या मुलीची हत्या केली. मुलीचं प्रेम मान्य नसल्याने वडिलांसह घरातील सगळ्यांनी मिळून तिची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे. मनिषा धनगर असं या मुलीचं नाव आहे. पोलिसांनी तिच्या हत्येच्या आरोपाखाली वडिलांसह काका आणि आजीला अटक केली. तिघंही आरोपींची न्यायालयाने 12 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

13 मार्चपासून मनीषा गायब होती. तिचा शोध घेण्याचं नाटक तिचे कुटुंबीय करत होते. पण 13 मार्चलाच मनीषाचा गळा दाबुन तिचा मृतदेह पाचोरा शिवारातील रेल्वे रुळावर टाकण्यात आलं होतं. हा मृतदेह बेवारस आहे असं समजून पोलिसांनी त्यावर अंत्यविधीही केले, पण गोपनीय पत्राने तिच्या खूनाचा प्रकार उघडकीस आला. आता मनीषाच्या मृतदेहाची डीएनए (DNA) चाचणी पोलीस करणार आहेत. दरम्यान, समाजात अजूनही जातीपातीचा किती वाईट पगडा आहे हे या घटनेनं दिसुन आलंय. माणुसकीला काळीमा फासणा-या या घटनेतील तिनही आरोपींची न्यायालयाने 12 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

close