पाणी टंचाईच्या विरोधात मनसेचा रास्ता रोको

April 9, 2012 7:50 AM0 commentsViews: 3

09 एप्रिल

नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये पाणी टंचाईच्या विरोधात मनसेच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. मनमाडमध्ये सध्या तब्बल 15 दिवसांनी पाणी येतंय. कमी पावसामुळे वाघदर्डी धरणातला पाण्याचा साठा संपत आला आहे. पण राज्य शासनाला पाठवलेला टंचाई कृती आराखडा अद्यापही प्रलंबित आहे. 60 बोअरवेल बांधणे, खाजगी विहिरी ताब्यात घेणे आणि पाईपलाईनची दुरुस्ती, डागडुजी यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. पण त्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पडून आहे.

close