मेळघाटच्या जंगलात महिन्याभरापासून वणवा

April 7, 2012 8:10 AM0 commentsViews: 7

07 एप्रिल

उन्हाळा सुरू झाला की जंगलात वणवा लागण्याचा प्रकार सुरू होतो. अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटच्या जंगलात गेल्या एक महिन्यापासून वणवा लागला आहे. अंदाजे 30 हजार हेक्टवर हा वणवा लागलाय. वन विभाग आणि व्याघ्र प्रकल्पाच्या विविध भागात ही आग लागली आहे. या आगीत जंगलाचे आणि त्यात राहणार्‍या प्राण्यांचं मोठं नुकसान झालंय. मात्र या वर्षी जंगलात लागणारा वणवा विझवण्यासाठी सरकारने निधीच दिलेला नाही त्यामुळे वनाधिकार्‍यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.

वणवा लागण्याची कारणे- तेंदुपत्ता जास्त येण्यासाठी कंत्राटदारांकडून लावला जातो वणवा- मोहफुले वेचण्यासाठी आदीवासींकडून वणवा लावला जातो- तर गुरांच्या चार्‍यासाठी गवत चांगलं येतं म्हणूनही वणवा लावला जातोसगळ्यात महत्वाचं आणि खरं कारण म्हणजे- सागवानची होणारी तस्करी लपवण्यासाठी असे वणवे लावले जातात.

close