राज्यात 9 जिल्ह्यांना दुष्काळाची झळा

April 9, 2012 5:44 PM0 commentsViews: 92

09 एप्रिल

उन्हाळा सुरु होताच राज्यात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. गावकर्‍याच्या डोळ्याला पाणाच्या धारा लागल्यायत पण अनेक वर्ष होऊनही सरकार मात्र या गावकर्‍यांना पाणी पुरवण्यात अपयशी ठरलंय. राज्य सरकारने एकूण 9 जिल्हे टंचाईग्रस्त घोषित केले आहेत. यामध्ये द्राक्षांचे शहर असलेल्या नाशिकचा नंबर लागला आहे. एकीकडे द्राक्षांचे विक्रमी उत्पादन घेणारे नाशिक दुष्काळाच्या यादीत टाकले गेले आहे. मागील वर्षी वेळेअभावी पावसामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्यांनी राज्याला एकच हादर बसला होता. आता उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच नाशिककरांना पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. तर दुसरीकडे सांस्कृती शहर आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुण्याचे नाव ही दुष्काळ जिल्हाच्या यादीत आले आहे.

सांगली जिल्ह्यात एकूण 8 तालुके टंचाईग्रस्त आहेत. त्यातले आटपाडी आणि जत या तालुक्यांमध्ये तर दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. खानापूर आणि कवठेमहांकाळ या तालुक्यांमध्येसुद्धा पाणी टंचाई आहे. आटपाडी तालुक्यातल्या शेटफळेमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली. टँकरची वाट पाहत गावकरी लांब रांग लावून बसले आहेत. दिवसातून फक्त एकदाचं पाणी येतं. प्रत्येकाला फक्त चार घागरी पाणी मिळते. पण या टँकरची वाट बघत गावकरी सकाळी आठ वाजल्यापासून रांगा लावून बसतात आणि टँकर कधीतरी दुपारी 12 वाजता येतो.

तर पाण्याच्या टंचाईमुळे पिण्याचं पाणी, चारा टंचाई यासोबतचं डाळींब बागा वाळत चालल्या आहेत. आटपाडी तालुक्यात डाळींबाचं पिक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. पण पाणीच नसल्यामुळे तब्बल 95 टक्के बागा वाळल्या आहेत. त्यामुळे शेतकरीही हवालदिल झाला आहे. तर दुसरीकजे

उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या भीषण पाणी टंचाई जाणवतेय. पाणी टंचाईमुळे नागरिकांसहित प्राण्यांनाही पाण्यासाठी दूरपर्यंत जावं लागतंय. मराठवाड्यात यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे पाणी टंचाई जाणवत आहे. जिल्ह्यातल्या बहुतांश लघु आणि मध्यम प्रकल्पांची आणि कुपनलिकेतली पाणीपातळीही खालावली आहे. महिलांना आणि लहान मुलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

टंचाईग्रस्त जिल्हे

सांगलीसातारासोलापूरपुणेधुळेअहमदनगरनाशिकलातूरउस्मानाबाद

close