भुजबळांच्या ‘एमईटी’ची चौकशी

April 7, 2012 5:30 PM0 commentsViews: 3

07 एप्रिल

सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांच्या एमईटी(MET)या शिक्षण संस्थेच्या चौकशीसाठी आज सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी पाहणी केली. मुंबईतल्या या नामवंत शिक्षण संस्थेत भुजबळांनी 179 कोटींचा गैरव्यवहार केलाय असा आरोप तक्रारदार आणि या संस्थेचे फाऊंडर सुनील कर्वेंनी केला. संस्थेच्या 2 मजल्यांवर बेकायदेशीर बांधकाम झाल्याचं आज स्पष्ट झालंय. मुंबई एजुकेशन ट्रस्ट.. मुंबईतली एक मोठी शैक्षणिक संस्था.. पण शनिवारी इथे पोलिसांचा गराडा होता. कारण संस्थेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी गैरव्यवहार केलाय का, हे तपासायला असिस्टंट चॅरिटी कमिश्नर मंगेश देशपांडे आले होते. ते येताच नाट्याला सुरुवात झाली. कारण तक्रारदार आणि संस्थेचे संस्थापक सुनील कर्वेंनाच.वादग्रस्त 8व्या आणि 10व्या मजल्यावर प्रवेश करायला मनाई करण्यात आली. छगन भुजबळांनी आपल्या पदाचा गैरवापर करून संस्थेच्या 8व्या आणि 10 व्या मजल्याचा खासगी कामासाठी वापर केल्याचा आरोप आहे. या जागेची चार तास पाहणी केल्यानंतर सहाय्यक धर्मादाय आयुक्त बाहेर पडले. या कारवाईवर बोलायला छगन भुजबळांनी नकार दिला. पण एमईटीच्या वकिलांनी मात्र 2 महिन्यांनंतर पहिल्यांदा तोंड उघडलं.एमईटी प्रकरण न्यायालयात आहे. त्याबद्दल जे बोलायचे आहे, ते न्यायालयात बोलेन अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली. आता 11 एप्रिलच्या दिवशी धर्मादाय आयुक्त या विषयावर सुनावणी करणार आहेत. राज्यात मंत्री असणार्‍या भुजबळांच्या दृष्टीने हा दिवस महत्त्वाचा असेल.

close