‘शाळा बंद का करु नये’ ; 1500 शाळांना नोटिसा

April 9, 2012 12:54 PM0 commentsViews: 14

09 एप्रिल

राज्यातल्या पंधराशे शाळांना शालेय शिक्षण खात्याने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यात नांदेड जिल्ह्यातल्या 300 शाळांचा समावेश आहे. पटसंख्येत झालेल्या घोळामुळे या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शाळा बंद का करू नये, असा सवाल या नोटिशीत विचारण्यात आला आहे. काही शाळांमध्ये जास्त मुलं दाखवून फसवण्यात आल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी उघड झाला होता. त्यानंतर राज्यभर पटसंख्या तपासण्यात आली आहे. यात 20 टक्क्यांहून कमी पटसंख्या आढळली होती. मागिल वर्षी राज्यभरातील शाळांमध्ये पटपडताळणी मोहिम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत अनेक धक्कादायक प्रकार उघड झाले होते. मात्र मोहिम संपून काही महिनेच उलट नाही तोच पंधराशे शाळेच्या भोंगळ कारभाराबद्दल शिक्षण खात्याने नोटिसा बजावल्या आहेत.

close