नगरसेविकेनं केलं निवडणुकीत खोटं प्रतिज्ञापत्र सादर

April 9, 2012 1:04 PM0 commentsViews: 2

09 एप्रिल

मुंबईतल्या गोरेगावमधून नगरसेविका असलेल्या स्नेहा झगडे यांनी निवडणुकीत खोटं प्रतिज्ञापत्र सादर केल्याचं उघड झालं आहे. याविरोधात दुसर्‍या क्रमांकावर आलेल्या भाजप उमेदवार सुमन सावळ यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. स्नेहाने आपण अविवाहित असल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. पण ती विवाहित असल्याचे सावळ यांचं म्हणणं आहे. एवढंच नाही तर स्नेहाचे पती प्रवेश घाणेकर यांनीही वांद्रे कोर्टात धाव घेतली आहे. स्नेहाच्या वडिलांकडून धमक्या येत असल्याचा आरोप त्याने केला आहे.

close