पुण्याच्या मो.युनूसनं जिंकली औरंगाबाद मॅरेथॉन

November 23, 2008 5:53 PM0 commentsViews: 9

23 नोव्हेंबर औरंगाबादऔरंगाबादमध्ये रन औरंगाबाद या अर्धमॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. अर्धमॅरेथॉनमध्ये 5 हजारांहून अधिक स्पधर्कांनी यात भाग घेतला. वेरुळ-अंजिठा महोत्सव समिती आणि औरंगाबाद महापालिकेच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. हॉकीपटू धनराज पिल्ले यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. दोन लाख पंधरा हजार रुपयांची पारितोषिकं या स्पर्धेत देण्यात आली. 21 किलोमीटरची ही अर्ध मॅरेथॉन पुण्याच्या मोहम्मद युनूसनं जिंकली. धनराज पिल्लेंनी यावेळी औरंगाबादच्या खेळाडूंचं कौतुक केलं.आणि क्रिकेटप्रमाणेच हॉकी व इतर खेळांनाही चांगले दिवस येतील अशी आशा व्यक्त केली.

close