जॅकीदादाची पुण्यात ‘शाळा’

April 9, 2012 4:54 PM0 commentsViews: 4

09 एप्रिल

बॉलिवूड स्टार जॅकी श्रॉफ आता आपल्याला एका वेगळ्या भुमिकेत दिसणार आहे. ही भुमिका आहे एका शिक्षकाची… पुण्याशी कायमच नातं असलेला जॅकी श्रॉफ पुण्यामध्ये एक ऍक्टींग ऍकॅडमी सुरु करतोय. इंदिरा स्कुल आणि जॅकी श्रॉफ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या या ऍक्टींग स्कुलचं उद्घाटन आज झालं. यावेळी दिग्दर्शक अनंत महादेवन तसेच इंदिरा स्कुलच्या तरिता शंकर उपस्थित होत्या. एफटीआयआय (FTII) किंवा एनएसडी (NSD) मध्ये दोन किंवा तीन वर्षांचे कोर्स असतात. पण हल्ली मुलांना इतका वेळ नसतो. अस सांगत या ऍकॅडमीमध्ये 6 महिन्यांचा कोर्स ठेवणार असल्याचं जॅकी श्रॉफ यांनी यावेळी सांगितलं.

close