भारताने चौथी वनडे जिंकून सीरिजही जिंकली

November 23, 2008 6:25 PM0 commentsViews: 2

23 नोव्हेंबर भारताने चौथी वनडे 19 रन्सनी जिंकली. पावसामुळे दोनवेळा व्यत्यय आल्यानंतर चौथी वन डे 22 ओव्हरची करण्यात आली होती. भारताने आपल्या इंनिगमध्ये 166 रन्स केले. परंतु डकवर्थ लुईस नियमांचा वापर करून आता इंग्लंडसमोर 198 रन्सच आव्हान ठेवण्यात आलं. भारतातर्फे सर्वात जास्त रन्स सेहवागने केले. त्याने 69 रन्स केले. गंभीर 40 तर युवराजने 25 रन्स केले. इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. इंग्लंडकडून शहाने 72 रन्स, फ्लिटॉफ 32 रन्स केले. इंग्लंड आठ विकेटवर फक्त 178 रन्स करू शकली. भारतातर्फे झहीर , मुनाफ आणि इशांतने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. सात वनडे सीरिजमध्ये सलग चार वनडे जिंकून भारताने वनडे सीरिजही जिंकली.

close