मुंबईत येण्यापासून कोणी रोखू शकत नाही-नितीशकुमार

April 10, 2012 9:20 AM0 commentsViews: 1

10 एप्रिल

मुंबईत येण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही, मी देशाच्या कोणत्याही भागात जाऊ शकतो. मुंबईत जाण्यासाठी मला व्हिसाची गरज नाही असं प्रत्युत्तर नितिशकुमार यांनी मनसेला दिलं. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपण बिहारी जनतेस संदेशही देणार असल्याचं नितिश कुमार यांनी सांगितलं. येत्या 15 एप्रिलला मुंबईत बिहार दिन साजरा करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारही मुंबईत उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला मनसेनं विरोध दर्शवला आहे. त्यावर नितीशकुमार यांनी थेट मनसेला आव्हान दिलं. दरम्यान, मनसेचा नितीशकुमारांच्या दौर्‍याला विरोध नाही पण नितीश कुमारांची भाषा चुकीचा आहे. या संदर्भात पक्षाध्यक्ष राज ठाकरे मालेगाव इथल्या सभेत भूमिका स्पष्ट करतील असं मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.

close