जनावरांना चारा नसेल तर कत्तलखाने तरी उघडा – शेतकरी

April 10, 2012 9:34 AM0 commentsViews: 6

10 एप्रिल

चारा डेपो नाही तर जनावरांसाठी शासनाने कत्तलखाने तरी काढावेत अशी मागणी नाशिक जिल्ह्यातले त्रस्त शेतकरी करत आहेत. पाच दिवसांनी येणारा टँकर. माणशी 20 लिटर पाण्याचा निकष… त्यातही प्रत्यक्षात फक्त 8 लिटर पाणी. अशा अवस्थेत माणसाने काय प्यायचं आणि जनावरांना काय पाजायचं असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर सारख्या दुष्काळी तालुक्यात अत्यंक प्रतिकूल परिस्थितीत उभा राहिलेला दुधाचा व्यवसाय सध्याच्या टंचाईमुळे बिकट बनला आहे. 3 हजार रुपयांचा चारा आणि दीड हजार रुपयांचं पाणी आठवडाभरही पुरत नाही.

close