एमएमआरडीएच्या धर्तीवर पुण्यासाठीही पीएमआरडीए

April 10, 2012 12:07 PM0 commentsViews: 7

10 एप्रिल

मुंबईला शांघाय बनवण्याचे स्वप्न बाळगुण मुंबई मेट्रो, मोनो रेल्वे, उड्डाणपूल, स्कायवॉक, अशा महत्वाकांक्षी प्रकल्प उभे करणार्‍या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या धर्तीवर पुण्यासाठी पीएमआरडीए प्राधिकरण तयार करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधान परिषदेत ही घोषणा केली. यासंदर्भात एक अभ्यास गट राज्य शासनातर्फे निर्माण करण्यात आला आहे हा अभ्यास गट तीन महिन्यात अभ्यास करून आपला अहवाल सादर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या अभ्यासात एकूण 300 गावांचा यात समावेश असणार आहे तर जवळपास 60 लाख लोकसंख्या असलेली गावं यात असणार आहे. यामध्ये पुणे शहर, पिंपरी चिंचवड, लोणावळा, तळेगाव- दाभाडे, देहु या नगरपरिषदा पीएमआरडीएमध्ये असतील तर मावळ, हवेली आणि शिरुर तालुक्याचा काही भागही यात असेल.

close