खेळण्याच्या वादावरुन मित्राने केला मित्रावर चाकुहल्ला

April 10, 2012 10:27 AM0 commentsViews: 4

10 एप्रिल

पुण्यात शाळेत शिकणार्‍या शुभम शिर्के या 15 वर्षीय मुलाची 50 हजारांच्या खंडणीसाठी त्याच्याच मित्रांनी खून केल्याची घटना ताजी असतानाच अकोल्यात खेळण्याच्या वादातून विद्यार्थ्याने मित्रावरच चाकुहल्ला केल्याची घटना समोर आली आहे. शहरातील खैरे प्लॉट परिसरात हा प्रकार घडला. शहरातील डॉ.इकबाल उर्दु शाळेत शिकणारा 13 वर्षीय रेहान हा घराबाहेर खेळण्यासाठी गेला. त्याचवेळी मुसेब खान हा त्याचा 12 वर्षीय मित्र आपल्या भावासह खेळायला आला. रेहान आणि मुसेबमध्ये खेळण्यावरुन वाद झाला. या वेळी मुसेबनं रेहानवर चाकूने हल्ला केला. या हल्यात चिमुकल्या रेहानला छातीला जखम झाली. रेहानच्या कुंटुबीयांनी रेहानला उपचारासाठी सर्वोपचार हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

close