कोलकाताला ‘बालाजी’ पावला, बंगलोरवर ‘रॉयल’ विजय

April 10, 2012 3:32 PM0 commentsViews: 10

10 एप्रिल

कोलकाता नाईट रायडर्सला अखेर बालाजी पावला आणि त्यांनी आपलं विजयाचं खातं उघडलं. लक्ष्मीपती बालाजी घेतलेल्या चार विकेटच्या जोरावर नाईट रायडर्सने बलाढ्य बंगलोर रॉयलचा 42 रन्सनं पराभव केला. कोलकाताने विजयासाठी 165 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. पण बंगलोरची टीम 9 विकेट गमावत 123 रन्सच करु शकली. विराट कोहली, ख्रिस गेल, एबी डिव्हिलिअर्स असे प्रमुख बॅट्समन आज सपशेल फ्लॉप ठरले. लक्ष्मीपती बालाजीने 4 ओव्हरमध्ये फक्त 18 रन्स देत 4 विकेट घेतल्या. तर जॅक कॅलिस आणि शाकिब अल हसनने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. सलग दोन पराभवानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा हा पहिला विजय ठरला आहे.

close