पुणे महापालिकेचं वार्षिक बजेट सादर

April 10, 2012 4:15 PM0 commentsViews: 2

10 एप्रिल

पुणे महापालिकेचं 3,633 कोटींचे वार्षिक बजेट आज सर्वसाधारण सभेमध्ये सादर करण्यात आलं. महिलांच्या स्वच्छतागृहांसाठी दोन कोटींची तरतूद आणि वाहतूक नियंत्रणासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर पर्यावरण रक्षणासाठी खास तरतुदी अशा अनेक गोष्टींसाठी या बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे. लोकांच्या फायद्यासाठीचे बजेट सादर करण्याचा प्रयत्न केला असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी यावेळी सांगितलं. तर शहर स्वच्छतेसाठी एका खास स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितले. तर अनेक प्रमुख मुद्द्यांचा विचार या बजेटमध्ये झालाच नसल्याची टीका विरोधी पक्ष नेते वसंत मोरे यांनी केली.

पुणे महापालिकेचं वार्षिक बजेट

महिलांच्या स्वच्छतागृहांसाठी 2 कोटींची तरतूद मराठी भाषा संवर्धन करण्यासाठी 10 लाख रुपयांची तरतूदसीएनजीसाठी 12 कोटी रुपये. तर अद्यानांसाठी 1 कोटीरुपयांची तरतूद गेल्या वर्षी टीका झालेल्या अनेक महोत्सवांसाठीच्या तरतुदी रद्द. यामध्ये पुणे फेस्टिव्हलचाही समावेश वाहतूक नियंत्रणासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद

close