लष्करप्रमुखांची सीबीआयकडे तक्रार

April 10, 2012 11:15 AM0 commentsViews: 2

10 एप्रिल

लष्करासाठी निकृष्ट दर्जाचे ट्रक खरेदी करण्यासाठी आपल्याला 14 कोटींची लाच देऊ केल्याचा आरोप लष्कर प्रमुख व्ही. के. सिंग यांनी केला होता. याप्रकरणी सिंग यांनी आज सीबीआयकडे लिखित तक्रार केलीय. निवृत्त लेफ्टनंट जनरल तेजिंदर सिंग यांनीच आपल्याला लाच देऊ केली होती, असा आरोप सिंग यांनी या तक्रारीत केला आहे. त्यामुळे तेजिंदर सिंग यांच्याविरोधात सीबीआय गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. दरम्यान, तेजिंदर सिंग यांनीही लष्कर प्रमुखांविरोधात पटियाला हाऊस कोर्टात मानहानी याचिका दाखल केलीय. याप्रकरणी लष्कर प्रमुखांना समन्स बजावायचे की नाही, यावर कोर्ट 21 तारखेला निर्णय देणार आहे.

close