शुभमचे मारेकरी अल्पवयीन नाहीच !

April 10, 2012 4:20 PM0 commentsViews: 1

10 एप्रिल

पुण्यातील शुभम शिर्के प्रकरणातील तीन पैकी दोन आरोपी अल्पवयीन नसल्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार आता शुभमच्या मारेकर्‍यांच्या गुन्ह्यात आणि पयार्याने त्यांच्या शिक्षेत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही दिवसापुर्वी भोसरी परीसरात राहणार्‍या शुभमच्याच वर्ग मित्रानी 50 हजार रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करुण त्याचा खून केला हाता. त्यानंतर खून करणार्‍यांना पोलिसांनी अटक केली होती. त्या वेळी हे आरोपी अल्पवयीन असल्याचे पोलिसांना आढळल्यामुळे त्यांनी ह्या गुन्हेगारांना बालसुधार गृहात ठेवल होतं. पण आता अधिक तपासानंतर पोलिसांना या आरोपींच्या वयाचा दाखला आणी वैद्यकीय चाचणी केल्या,आणी आज डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानुसार आता पोलीस पुन्हा या गुन्हागारांना न्यायालयासमोर हजर करणार असल्याची माहिती पोलीस अधिकार्‍यांनी दिली.

close