दुष्काळग्रस्त भागात ओला चारा देणार -पतंगराव कदम

April 11, 2012 8:19 AM0 commentsViews: 5

11 एप्रिल

दुष्काळाच्या चर्चला सरकारच्या वतीने पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांनी उत्तर दिलं. दुष्काळी परिस्थीतीतवर सरकारने मोठ्या प्रमाणात उपायोजना केल्या आहेत असं पतंगराव कदम यांनी सांगितले. 15 एप्रिलपासून ओला चारा उपलब्ध करुन देणार, 35 हजार हेक्टरवर चारा उपलब्ध करुन दिला गेला. सरकारचे निर्णय लागू न करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करणार असल्याचं कदम यांनी म्हटलं आहे. तर दुष्काळाचा फायदा घेणर्‍या टँकर माफियांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचही कदम यांनी चर्चेदरम्यान सांगितलं. दुष्काळावरील उपाययोजनाचं नियोजन सरकारने केलंय. दुष्काळ निवारण्यासाठी युध्दस्तरावर प्रयत्न सुरु आहे. प्रत्येक जिल्हात जिल्हाधिकार्‍यांना दुष्काळासाठी विशेष सेल स्थापन करण्याचे आदेश दिलेत.

close