मालेगाव पालिकेची रविवारी निवडणूक

April 12, 2012 10:45 AM0 commentsViews: 3

12 एप्रिल

राज्यातील 10 महापालिकांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता उर्वरीत पालिका निवडणुकीचे मैदान रंगू लागले आहे. 2001 ला स्थापन झालेल्या मालेगाव महापालिकेची तिसरी निवडणूक येत्या रविवारी होत आहे. त्यासाठी विक्रमी संख्येनं पक्ष आणि आघाड्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहे. 80 जागांसाठी होणार्‍या या निवडणुकीत 471 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, जनता दल, शिवसेना, मनसे यांच्या सोबत जनराज्य आणि शहर विकास या आघाड्याही आहेत. भुयारी गटार योजना, मोसम नदी सुधार प्रकल्प आणि घरकूल योजना हे प्रचाराचे महत्त्वाचे मुद्दे आहेत.

close