बिहारमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करावा – उध्दव ठाकरे

April 12, 2012 11:31 AM0 commentsViews: 2

12 एप्रिल

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि मनसेच्या वादात आता शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. नितीश कुमारांनी बिहारमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करावा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 15 एप्रिलला बिहार दिनानिमित्त मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी नितीश कुमार येणार आहेत. या कार्यक्रमाला जाण्यासाठी आपल्याला कोणाच्या व्हिसाची घरज नाही असं वक्तव्य नितीशकुमार यांनी केलं होतं. त्यावर अरेरावीची भाषा खपवून घेतली जाणार नाही असं मनसेनं ठणकावलं होतं. त्यामुळे नितीशकुमार यांचं मुंबईत स्वागत होणार की त्यांना विरोध होणार हे लवकरच कळेल.

close