मनिषाच्या मृतदेहाची डीएनए चाचणी

April 11, 2012 11:45 AM0 commentsViews: 6

11 एप्रिल

जळगांव ऑनर किलिंग प्रकरणातील पाथरीच्या मनिषा धनगरच्या मृतदेहाचे अवशेष डीएनए (DNA) टेस्टसाठी घेण्यात आले. पाचोर्‍यात मनिषाचा मृतदेह पुरला होता. पोलीस निरीक्षक योगेश मोरे,तपास अधिकारी प्रदीप ठाकूर यांच्यासह सरकारी डॉक्टरांच्या निगराणीत या मृतदेहाचे सॅम्पल घेण्यात आलं. डीएनए टेस्टसाठी घेतलेले सॅम्पल आता मुंबईच्या कुलाबा लॅबमध्ये पोलिसांनी पाठवला आहे. मुलीने दुसर्‍या जातीच्या मुलाशी प्रेमप्रकरण सहन न झाल्यामुळे मनिषाच्या वडिल,आजी आणि काकांना 12 मार्चला गळा दाबून खून केला. आणि पहाटे मनिषाचा मृतदेह रेल्वे ट्रकवर टाकण्यात आला. 23 दिवसांनतर पोलिसांना मिळालेल्या निनावी पत्रामुळे मनिषाची हत्या झाल्याचे उघड झाले.

close