सराफांच्या हत्येप्रकरणी व्यापार्‍यांचा बंद

April 12, 2012 1:20 PM0 commentsViews: 5

12 एप्रिल

मालाड स्टेशनजवळ बुधवारी भरदिवसा सराफ व्यापारी आणि त्याच्या नोकराची हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या विरोधात आज सराफ व्यापारी रस्त्यावर उतरले. आज मालाड पूर्व भागात सराफांनी दुकानं बंद ठेवली आहेत. पोलिसांच्या विरोधात सराफ व्यापार्‍यांनी घोषणाबाजी केली. मालाड रेल्वेस्टेशच्या फूटओव्हर ब्रिजजवळ तीन सशस्त्र दरोडेखोरांनी धारदार शस्त्रांनी हल्ला करून सराफाकडची दागिन्यांची बॅग पळवून नेली होती. या घटनेत सराफ पारस परमान आणि त्याचा नोकर हेमंत बिष्णोई या दोघांचा मृत्यू झाला.

close