षटकार ट्रॉफी उम्रीगर इलेव्हन संघानं जिंकली

November 23, 2008 5:42 PM0 commentsViews: 3

23 नोव्हेंबर मुंबई16 वर्षांखालील मुलांसाठी आयोजित षटकार ट्रॉफी उम्रीगर इलेव्हन संघानं जिंकली. तर गावस्कर इलेव्हन संघ उपविजेता ठरलाय. षटकार ट्रॉफीचं हे पंचवीसावं वर्ष आहे. साखळी पद्धतीनं खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत उम्रीगर इलेव्हननं 10 पॉईंटस्‌ची कमाई केली तर गावसकर इलेव्हननंही 10 पॉईंटस् पटकावले. मात्र लीग मॅचमध्ये उम्रीगर इलेव्हननं गावस्कर इलेव्हनवर मात केल्यामुळे त्यांना विजयी ठरवण्यात आलं. रांगणेकर इलेव्हनचा अब्दुल कलाम या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ठ खेळाडू ठरला. तर रांगणेकर इलेव्हनचा सर्वोत्कृष्ठ जयदीप परदेशी बॅट्समन आणि सर्वोत्कृष्ठ क्षेत्ररक्षकाचा मानकरी ठरला. भारतीय निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

close