कसाबवर आतापर्यंत 25 कोटी रुपये खर्च

April 11, 2012 12:22 PM0 commentsViews: 3

11 एप्रिल

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांचे जीव घेणार्‍या अजमल कसाबवर आतापर्यंत जवळपास 25 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी विधानसभेत ही माहिती दिली. यात कसाबच्या जेवणापासून त्याच्या सुरक्षेवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहे. कसाबच्या सुरक्षेवर आतापर्यंत 5 कोटी 25 लाख रुपये खर्च करण्यात आलेत. तर कसाबच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांच्या पगारावर 1 कोटी 22 लाख 18 हजार रुपये खर्च करण्यात आलेत. तर त्याच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या आयटीबीपी (ITBP)च्या जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी 19 कोटी 28 लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. ज्यांच्या जेवणांचा खास कायमचा हिरावून घेणार्‍या कसाबच्या जेवणावर आतापर्यंत 34 हजार 975 रुपये खर्च करण्यात आले आहे. तर त्याच्यावरील मेडिकल खर्च 28 हजार 66 रुपये झाला आहे.

close