गेट वे ऑफ इंडियावर रिपाइंच्या सोहळ्याला परवानगी नाकारली

April 12, 2012 1:28 PM0 commentsViews: 5

12 एप्रिल

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 121 व्या जंयती निमित्त 14 एप्रिल रोजी गेट वे ऑफ इंडियाजवळ आरपीआयच्या सोहळ्यासाठी परवानगी मागितली होती पण बीपीटीने ही परवानगी नाकारली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आरपीआय याठिकाणी भव्य कार्यक्रम आयोजित केला आहे. पण बीपीटीने परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मध्यस्थी करावी, अशी विनंती आरपीआयच्या नेत्यांनी केली. पण मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत असमर्थतता व्यक्त केली. त्यावर परवानगी मिळाली नाही, तरी गेट वे ऑफ इंडियावर सोहळा होणारच अशी भूमिका आरपीआयने घेतली आहे.

close