कॅगचा अहवाल फुटला कसा ?

April 12, 2012 1:43 PM0 commentsViews: 4

12 एप्रिल

कॅगचा अहवाल लिक कसा झाला ? यावरुन आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. मंत्रिमंडळातल्या ज्येष्ठ मंत्र्यांनी यावरुन वाद उपस्थित केला. विशेषतः छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कॅगचा अहवाल लिक कसा झाला यावरुन जाब विचारल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मागिल आठवड्यात भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी कॅगच्या अहवालाची एक सीडीच विधानसभा अध्यक्षांकडे जमा केली. या अहवालात दहा आजी,माजी मंत्र्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यावरुन आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत जोरदार वाद झाला. आता याच मुद्यावर उद्याही मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे. येत्या 16 एप्रिलला कॅगचा अहवाल विधानसभेत मांडला जाणार आहे. हा अहवाल लिक कसा झाला याची संपूर्ण सीआयडी चौकशी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

close