मंगळवेढा तालुक्याला पाणीटंचाईचा वेढा

April 11, 2012 9:38 AM0 commentsViews: 86

11 एप्रिल

सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा तालुक्यातल्या जवळपास 35 गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. या गावांमध्ये बंधारे कोरडे पडले आहे. तर विहिरींचही पाणी आटलंय. त्यामुळे नागरीकांना सर्वस्वी पाण्याच्या टँकरवर अवलंबुन रहावं लागतं. पण त्या टँकरच्याही येण्याची वेळ निश्चित नसल्याने त्यांना फक्त वाट पाहण्यावाचुन काही पर्याय उरत नाही, टँकर आल्यानंतरही अनेकदा नागरीकांमध्ये पाण्यावरुन धक्काबुक्कीचे प्रसंगही घडतात.याच मंगळवेढा तालुक्यातल्या भळवणी गावातीलस शेतकरी आणि महिलांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्यात. विषेश म्हणजे मंगळवेढा हा केंद्रीय ऊर्जा मंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या आधीच्या मतदारसंघाचाच एक भाग आहे आणि सध्याचे राज्याचे पाणी-पुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे हेही याच परिसारातले आहेत.

close