चेन्नईचा बंगलोरवर ‘रॉयल’ विजय

April 12, 2012 5:20 PM0 commentsViews: 4

12 एप्रिल

आयपीएलमध्ये आज चेन्नईनं बंगलोरचा 5 विकेट राखून पराभव केला. पहिली बॅटिंग करणार्‍या बंगलोर रॉयल चॅलेंजर्सने 8 विकेट गमावत 205 रन्सचं आव्हान चेन्नई समोर ठेवलं. पण चेन्नईने अवघ्या 5 विकेटच्या मोबदल्यात हे बलाढ्य आव्हान पार करत शानदार विजय मिळवला. टॉस जिंकून पहिली बॅटिंग करणार्‍या बंगलोरने दणदणीत सुरुवात केली. मयांक अग्रवालनं 46 तर ख्रिस गेलनं 68 रन्स केले. याला चेन्नईच्या बॅट्समननंही अगदी जशास तसं उत्तर दिलं. चेन्नईच्या सर्वच प्रमुख बॅट्समननं विजयात हातभार लावला. चेन्नईचा हा दुसरा विजय तर बंगलोरचा हा दुसरा पराभव ठरला.

close