केंद्र सरकारचे निर्यात धोरण शेतकरी विरोधी – पवार

April 11, 2012 4:04 PM0 commentsViews: 6

11 एप्रिल

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची केंद्र सरकारच्या निर्यात धोरणावर जाहीर टीका केली आहे. केंद्र सरकारचे निर्यात धोरण शेतकरी विरोधी असल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे. याबाबत शरद पवारांनी पंतप्रधान मनमोहन सिंग याांना पत्र लिहुन धोरणावर टीका केली. यापत्रात त्यांनी कापूस आणि साखरेवरील निर्यातीवर घातलेल्या बंधनावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी अन्न-नागरी पुरवठा मंत्री के व्ही थॉमस यांच्यावरही टीका केली. केंद्र सरकार उद्योगांना सबसीडी देतंय, पण त्याचा फटका शेतकर्‍यांना बसतो असं पवारांनी लिहिलं आहे. त्याचबरोबर वस्त्रोद्योग मंत्री आनंद शर्मा यांचाही पवारांनी चांगलाच समाचार घेतला.

close