‘बाबू बॅन्ड बाजा’ उद्या सिनेमागृहात

April 12, 2012 5:33 PM0 commentsViews: 3

12 एप्रिल

या वीकेण्डला तुम्हाला सिनेमा प्लॅन करायचा असेल, तर तुमच्याकडे खूप ऑप्शन्स आहेत. तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला 'बाबू बॅन्ड बाजा' सिनेमा रिलीज होतोय. राजेश पिंजानीनं सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. मिलिंद गवळी, मिताली जगताप आणि बालकलाकार विवेक यांच्या भूमिका आहेत. बॅण्डवाल्याच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतला. तसेच मराठीत आणखी एक सिनेमा 'कशाला उद्याची बात' हाही सिनेमा रिलीज होतोय. तो हिंदीतही 'छोडो कल की बातें' या नावानं रिलीज होतोय. अनुपम खेर अंध माणसाच्या भूमिकेत आहेत. तर सचिन खेडेकरची यात महत्त्वाची भूमिका आहे. बॉलिवूडमध्ये 'बिट्टो बॉसही पाहता येईल आणि हॉलिवूडचा 'बॅटलशिप' हा सायन्स फिक्शन सिनेमा रिलीज होतोय.

close