अखेर पंजाबने विजयाचे खाते उघडले

April 12, 2012 6:19 PM0 commentsViews: 4

12 एप्रिल

बॉलिवूड स्टार प्रिती झिंटाच्या गालावरची खळी अखेर खुलली. प्रिती झिंटाच्या किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीलएलच्या पाचव्या हंगामातला पहिला वहिला विजय मिळवला आहे. घरच्या मैदानावर खेळणार्‍या किंग्ज इलेव्हनने पुणे वॉरियर्सचा 7 विकेट राखून पराभव केला. पहिली बॅटिंग करणार्‍या पुणे वॉरियर्सची टीम 19 ओव्हरमध्येच 115 रन्सवर ऑलआऊट झाली. दिमित्री मस्कार्‍हेनेसच्या भेदक बॉलिंगसमोर पुण्याचे वॉरियर्स सपशेल फ्लॉप ठरले. मस्कार्‍हेनेसनं पाच विकेट घेतल्या. पुणे टीमतर्फे मिथुन मिन्हासनं 31 रन्स करत एकाकी झुंज दिली. पण इतर बॅट्समनची त्याला साथ लाभली नाही. किंग्ज इलेव्हन पंजबाची सुरुवातही खराब झाली. इनिंगच्या पहिल्याच बॉलवर अशोक दिंडाने पॉल वल्थाटीला क्लिन बोल्ड केलं. पण यानंतर कॅप्टन ऍडम गिलख्रिस्ट आणि शॉन मार्शने इनिंग सावरली. गिलख्रिस्ट 21 रन्सवर आऊट झाला. पण मार्शने नॉटआऊट 64 रन्स करत किंग्जच्या पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

close