उद्या उघडणार ‘आदर्श’च्या चौकशीचा अहवाल

April 12, 2012 9:22 AM0 commentsViews:

12 एप्रिल

बहुचर्चित आदर्श सोसायटी घोटाळाप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या न्यायालयीन चौकशी आयोगाचा अहवाल अखेर तयार झाला आहे. उद्या राज्य सरकारसमोर हा अंतरिम अहवाल सादर केला जाणार आहे. एका बंद लिफाफ्यामध्ये हा अहवाल सादर केला जाणार आहे. या अहवालातून आदर्शची जमीन नेमकी कोणाची आहे हे स्पष्ट होणार आहे. आजपर्यंत आदर्श घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने कारवाई करत 9 जणांना अटक केली आहे. एकूण 14 जणांची यादी असलेल्या पैकी 9 जणांवर कारवाई झाल्यामुळे आता मंत्र्यांचा नंबर कधी लागणार ? मंत्र्यांवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

close