गुजरात दंगलप्रकरणी 18 जणांना जन्मठेपेची शिक्षा

April 12, 2012 9:31 AM0 commentsViews: 4

12 एप्रिल

गोध्राकांडानंतर उसळलेल्या दंगलींमधल्या ओड नरसंहार प्रकरणात स्पेशल कोर्टाने 18 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर 5 जणांना सात वर्षांचा तुरुंगवास देण्यात आला आहे. सोमवारी या प्रकरणात स्पेशल कोर्टाने 22 जणांना दोषी ठरवलंय तर 23 जणांची मुक्तता केली आहे. गुजरातमधल्या आणंद जिल्ह्यातल्या ओड गावात गोध्राकांडानंतर दंगल उसळली होती. त्यावेळी जीव वाचवण्यासाठी 27 जण एका घरात लपले होते. पण दंगलखोरांनी त्या घरालाच आग लावली. यात सर्वच्या सर्व 27 जणांचा मृत्यू झाला होता.

close