पेट्रोलच्या दरात 7 रुपये दरवाढीची कंपन्यांची मागणी

April 13, 2012 9:45 AM0 commentsViews: 6

13 एप्रिल

चालू वर्षात आर्थिक बजेटमध्ये सर्वसामान्यांवर लादण्यात आलेल्या करवाढीने दबलेलेल्या जनतेला आता आणखी फटका बसणार आहे.गेल्या 3 महिन्यापासून पेट्रोल दरवाढ मागे पुढे होत असताना आता देशातील पेट्रोलियम कंपन्यांच्या गटानं पेट्रोलची प्रतिलिटर दरवाढ 7 रुपये 67 पैसे करावी अशी मोठी मागणी केली आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणात दरवाढीची मागणी झाली तर किमान दरवाढीची शक्यताही व्यक्त होत आहे. मागिल वर्षी डिसेंबर महिन्यापासून ही दरवाढ रोखून धरण्यात आली होती. मध्यतंरी पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या त्यांनतर अर्थसंकल्प आल्यामुळे पुन्हा दरवाढ पुढे ढकलण्यात आली. पेट्रोल कंपन्यांना आंतराष्ट्रीय बाजारपेठेत क्रुड तेलाच्या वाढत्या किंमती, डॉलरच्या तुलनेत रुपायाची घसरण यामुळे मागिल वर्षी डिसेंबर महिन्यात पहिली दरवाढीची मागणी करण्यात आली. त्यानंतर जानेवारीमध्ये 2.50 पैसे वाढ करण्याची मागणी केली. पण दरवाढ पुढे ढकलल्यामुळे मार्च महिन्यात झालेल्या बैठकीत 5 रुपये वाढ करण्यावर येऊन ठेपली. आज झालेल्या बैठकीत तीन्ही महिन्यांची वेटिंग भूमिका पूर्ण करत 6 रुपये 67 पैसे दरवाढ करण्याची मागणी केली आहे. आता कंपन्याच्या या मागणीला सरकार काय उत्तर देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

close