नाशिकमध्ये पाण्याअभावी पीकं करपली

April 12, 2012 10:00 AM0 commentsViews: 1

12 एप्रिल

नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याच्या पाणी टंचाईची झळ बसली आहे. तर द्राक्ष बागा आणि भाजीपाला करपायला लागला आहे. चांदवड, देवळा, सटाणा आणि नांदगाव या तालुक्यातल्या उन्हाळी पिकांना दुष्काळाचा फटका बसतोय. शेतकर्‍याचं वर्षाचं अर्थकारण अवलंबून असलेल्या उन्हाळी कांद्याची अनेक ठिकाणी पाण्याभावी लागवडच झालेली नाही, जिथे लागवड झाली तिथेही पीक करपलंय. द्राक्षबागांच्या काड्यांची वाढ न झाल्याने पुढल्या वर्षीच्या सीझनवरही त्याचा परिणाम झाला आहे.

close