लातूरमध्ये पाणीपुरवठा योजना फोल

April 13, 2012 7:50 AM0 commentsViews: 1

13 एप्रिल

लातूर जिल्ह्यात जीवन प्राधिकरणामार्फत सुरू करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजना फोल ठरल्या आहेत. 11 खेडी, 8 खेडी, 3 खेडी योजनांमध्ये थातुरमातूर काम करून लाखो रूपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गावकरी करत आहे. योजना पूर्ण होऊन गावात पाणी येईल अशा अपेक्षेनं बसलेल्या नागरिकांना कित्येक वर्षापासून या योजनेतून पाण्याचा थंेबही मिळाला नाही. लातूर जिल्ह्यातील मसलगा या 10 हजार लोकसंख्येच्या गावात 1995 पासून सूरू झालेल्या योजनेतून एकही थेंब पाणी मिळालेलं नाही.

close