नागपुरातला पेट्रोलपंप जपतोय सामाजिक बांधिलकी…

November 23, 2008 8:36 PM0 commentsViews: 6

23 नोव्हेंबर नागपूरकल्पना नळसकर आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेत टिकाव धरून नोकरी मिळवणे म्हणजे तारेवरची कसरत. या सगळ्यात सामान्य माणूसच कधी कधी आपला आत्मविश्वास गमावून बसतो.तिथे अपंगाना रोजगार देणार तरी कोण. पण नागपूरात असा एक पेट्रोल पंप आहे जिथे अपंगानाच रोजगार दिला जातो.नागपूरमधल्या छत्रपती चौकातील पेट्रोल पंप. इतर पेट्रोल पंपापेक्षा जरा वेगळा आहे. कारण या पेट्रोल पंपावर फक्त अपंगांना काम मिळतं. या पेट्रोलपंपाच्या मालक मेघा काळे यांना वयाच्या दुस-या वर्षी पोलिओमुळे अपंगत्व आलं. त्यामुळे आपल्याला भोगाव्या लागणा-या यातना इतरांच्या नशिबी येऊ नये यासाठी त्यांनी हा पेट्रोल पंप सुरू केला.या अनोख्या उपक्रमाविषयी पेट्रोल पंपाच्या मालक मेघा काळे सांगतात, माझं स्वप्नं होत की अपंगांसाठी काही तरी करायचं त्यामुळे मी पेट्रोलपंप सुरू केला. अपंग काम करू शकतात फक्त त्यांना त्यांच्या कुवतीप्रमाणे काम द्यायला पाहिजे.गावातून शहरात येऊन तीन वर्षांपूर्वी मेघा काळे यांनी पेट्रोलपंप सुरू केला. आणि गावातल्या अपंग लोकांना या पंपावर काम दिलं.या पेट्रोल पंपावरती तब्बल 70 टक्के अपंग कामगार काम करतात. कारण अपंगानाही जगण्याचा अधिकार असतो आणि ते लोक प्रत्येक काम करू शकतात हे दाखवून देण्यासाठी त्यांनी या पंपावर अपंगाना काम दिलं.या सगळ्यांना मेघा काळेंनी नवी आशा दिली आहे. आणि जगण्याचा नवा मार्ग दाखवला आहे.

close