मुख्यमंत्री भ्रष्टाचार रोखण्यास अपयशी ठरले -अण्णा हजारे

April 14, 2012 10:00 AM0 commentsViews: 3

14 एप्रिल

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रामाणिक आहे..मात्र भ्रष्टाचाराला ते आळा घालण्यात अपयशी ठरले आहेत. यासाठी कठोर कायद्याची गरज असल्याचं मत जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलंय. राज्यात सशक्त लोकायुक्त बिलासाठी अण्णा राज्यभर दौरा करणार आहेत. प्रत्येक जिल्हात जाऊन लोकपाल विधेयक, भ्रष्टाचार, आणि मतदानासाठी जागृती अभियान राबवणार आहे. येत्या 10 दिवसात अण्णा दौर्‍याला सुरुवात करणार आहे. हा दौरा झाल्यानंतर पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचंही अण्णांनी जाहीर केलंय.

close