रिक्षा युनियनला चपराक; इलेक्ट्रॉनिक मीटर बसणारच !

April 13, 2012 11:39 AM0 commentsViews: 3

13 एप्रिल

मनमानीने भाडे स्विकारणार, हवे तिथे भाडे मारणार, तीन प्रवाशांपेक्षा जास्त प्रवाशी लादून सुसाट निघालेल्या रिक्षाचालकांच्या युनियनला हायकोर्टापाठोपाठ सुप्रीम कोर्टाने चपराक लगावली आहे. हायकोर्टाने रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मिटर बसणारच असं बजावून सांगत याचिका फेटाळून लावली. रिक्षा युनियनने इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली. पण सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावली. तसेच रिक्षांना मिटर बसवाच या निर्णयाची काटेकोरपणे अमंलबजावणी करा असे आदेश कोर्टाने राज्य सरकारला दिले. आणि जर अमंलबजावणी न झाल्यासं संबधीतांवर कारवाई करण्याचे निर्देशही हायकोर्टाला देण्यात आले आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे प्रवाशांना याचा फायदा होणार हे निश्चित आहे.

close